राज्यभरात झिकाच्या रूग्णसंख्येत (Zika Virus) झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आजार पसरताना दिसत आहेत. झिका व्हायरसचे (Zika Virus) राज्यातील सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. पुणे शहरात झिका व्हायरसचे आणखी सात रुग्ण आढळले आहेत. एकूण प्रकरणांची संख्या 73 वर पोहोचली आहे PMC (पुणे महानगरपालिका) आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)