उद्धव ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तीव्र शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले आहे. आपण तीन महिन्यांपूर्वी क्रांती केल्याचे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच केले होते. त्यांच्या विधानाचा धााग पकडत संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे. राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''मुख्यमंत्री शिंदे म्हणतात तीन महिन्यांपूर्वी क्रांती केली. क्रांती दिसत आहे.महाराष्ट्र इतका लेचा पेचा कधीच झाला नव्हता.तीन महिन्यात महाराष्ट्राचे दिल्लीच्या दारातील पायपुसणे करून टाकले . स्वाभिमानी म्हणून शिवसेना सोडली असे बोलणारे आज तोंडाला कुलूप लावून बसले आहेत.हा षंढ पणा आहे''.

Check Sanjay Raut's Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)