मराठा आरक्षण मुद्द्यावर आयोजित दिल्ली येथील बैठकीस महाराष्ट्रातील 30 खासदारांनी उपस्थिती लावली. तसेच, त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. आम्ही याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहीणार आहोत. आम्हाला आशा आहे की, ते या प्रश्नात हस्तक्षेप करतील आणि समाजाला न्याय मिळवून देतील, अशा भावना संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केल्या आहेत. खासदारांच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पाहा काय म्हणाले संभाजी छत्रपती.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात मोठा वाद पेटला आहे. एका बाजूला मनोज जरांगे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व करत आहेत. दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून धरला आहे. दोन्ही सामा समोरासमोर उभे ठाकण्याची चिन्हे निर्माण झाली असतानाच संभाव्य संघर्ष टाळण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी मागणी पुढे येत आहे. (हेही वाचा,Chhagan Bhujbal Claims Threat To Life: 'माझी हत्या होऊ शकते'; मराठा विरोधी भूमिकेवरून जीवाला धोका असल्याचा छगन भुजबळांचा दावा )

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)