अभिनेत्री उर्फी जावेद हिने राज्य महिला आयोगाला दिलेल्या अर्जाची दखल घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तांना आदेश दिले आहेत. उर्फी जावेद हिचा अर्ज राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला आहे. त्या अर्जात तिने मुंबईत आपल्याला असुरक्षीत वाटत आहे. आपल्यावर हल्या होण्याची भीती व्यक्त करत सुरक्षा मागितली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांना आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करुन द्यावी असे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास उर्फी जावेद यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. यामध्ये अर्जदार असे नमूद करतात की,"मी सिनेसृष्टीशी संबंधित असलेल्या फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे , माझं राहणीमान आणि दिसणं व्यावसायिक दृष्ट्या आवश्यक आहे , असे असतानाही त्याबाबत नाहक तक्रारी1/2 pic.twitter.com/6OL7Of0K7G
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)