नागपूर मधील जामठा येथील राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्युटचं आज (27 एप्रिल) लोकार्पण झालं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट हे 470 बेडचं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार दिले जाणार असून धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे.
पहा ट्वीट
नागपुरातल्या जामठा येथील राष्ट्रीय कर्करोग संस्थेचं आज मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MahaDGIPR @DDNewslive @DDNewsHindi pic.twitter.com/gLqNQGFvlW
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)