रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-हर्णे मार्गावर आसूद येथे ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार तर काही प्रवासी जखमी झाले. या अपघाताबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींना सरकारी खर्चाने योग्य ते वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे. (हेही वाचा - Ratnagiri Accident: दापोलीत ट्रक- वडाप गाडीचा भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी)
पाहा ट्विट -
Eight people were killed and some passengers were injured in a truck and rickshaw accident at Asud on the Dapoli-Harne road in Ratnagiri district. Maharashtra CM Eknath Shinde expressed his condolences & announces to give Rs 5 lakh each to the families of the deceased from the…
— ANI (@ANI) June 26, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)