अशोक चव्हाण यांचा कॉंग्रेस पक्षाला रामराम हा अनेकांसाठी धक्का होता. आज त्यांचा भाजपा पक्षामध्ये प्रवेश झाल्यानंतर कॉंग्रेसने तातडीची बैठक बोलावली होती. महाराष्ट्र कॉंग्रेस प्रभारी रमेश चैन्निथला यांनी यावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांना पक्ष का सोडावा लागला याच कारण खुलेपणाने सांंगावं. त्यांच्या जाण्याने कॉंग्रेस अथवा महाविकास आघाडीवर परिणाम होणार नाही. पक्षामध्ये लढण्याची क्षमता आहे आणि आगामी निवडणूकीमध्ये सर्वाधिक जागा निवडून येतील हा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. Ashok Chavan on Congress: मनात काँग्रेस भाजपात प्रवेश ; अशोक चव्हाण यांचा पक्षांतर कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)