मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यामधून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले होते. विविध मुद्द्यांवर त्यांनी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांवर टीका केली होती. या सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अनेक सत्ताधारी नेत्यांनी राज ठाकरे यांना आपापल्या शब्दात प्रत्युत्तर दिले होते. आता आज ठाणे येथे राज ठाकरे महाविकास आघाडीमधील नेत्यांना उत्तर देणार आहेत. या सभेला ‘उत्तरसभा’ असे नाव मनसेकडून देण्यात आले आहे. खालील ठिकाणी तुम्ही या सभेचे थेट प्रक्षेपण पाहू शकाल.

दरम्यान, राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेमधून पंतप्रधान मोदींना दोन कायदे करण्याचे आवाहन केले आहे. सामान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर नियंत्रण आणणारा कायदा आणा, अशी विनाणती त्यांनी मोदींना केली आहे.

ते म्हणाले, 'मी माझी भूमिका बदलतो असे शरद पवार सांगत आहेत, परंतु मी माझी भूमिका कधी बदलली? पाकिस्तानी कलाकारांना देशातून कोणी हाकलले... मनसेने. आझाद मैदानात दंगलीत पोलीस भगिनींना मारहाण झाली, पत्रकारांच्या गाड्या जाळल्या गेल्या, तेव्हा कुणीच काही बोलले नाही मात्र त्यावेळी मनसेनेच मोर्चा काढला होता.' राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'ते (संजय राऊत) शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादीचे आहेत हेच काळात नाही.'

पुढे त्यांनी, राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ईदच्या सणापर्यंत मुदत दिली. तोपर्यंत राज्यातील सर्व मौलवींशी चर्चा करून 3 एप्रिलपर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्यात यावेत, अशा शब्दांत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारला अल्टिमेटम दिला.

ठाण्यातील पोलिसांना माझ्या गाड्यांचा ताफा लहानसहान संघटनांकडून अडवला जाणार आहे, याची माहिती मिळते. पण याच गुप्तचर यंत्रणांना शरद पवार यांच्या घरावर लोक जाणार आहेत, हे कळाले नाही, अशी खोचक टिप्पणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)