मराठा आरक्षणासाठी गेले 17 दिवस मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु होते ते त्यांनी मागे घेतले ही समाधानाची बाब आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं असा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे.  सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात याचे भान येऊन पोटातलं ओठावर आणताना सरकार यापुढे विचार करेल असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)