Raj Thackeray Meets Maratha Reservation Protestors: जालन्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचबरोबर गेल्या दोन दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज जालन्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आहे. यावेळी राज ठाकरे यांनी लोकांना आवाहन केलं की, तुम्ही विनाकारण राजकारण्यांच्या नादी लागू नका. त्या लोकांना फक्त तुमची मत पाहिजे आहेत. तथापी, आज राज ठाकरे जखमी ग्रामस्थांचीही भेट घेणार आहेत.
#WATCH | Maharashtra Navnirman Sena (MNS) chief Raj Thackeray, who is on his way to Jalna, meets Maratha reservation protestors at Chhatrapati Sambhaji Nagar pic.twitter.com/lreUSpZyJM
— ANI (@ANI) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)