Pune RTO Helpline Number: पुण्यात खाजगी बसचालकांच्या भाडेवाढीला बसणार चाप; आरटीओ कडून व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबर जारी
खाजगी बसचालकाने जर भाडं MSRTC च्या बसच्या भाडेदरापेक्षा दीड पट पेक्षा अधिक आकारल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.
पुण्यात खाजगी बसचालकांच्या भाडेवाढीला चाप बसणार आहे. आरटीओ कडून व्हॉट्सअॅप हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे तसेच इमेलच्या माध्यमातूनही प्रवाशांना अव्वाच्या सव्वा भाडे आकारणार्यांना रोखलं जाणार आहे. buscomplaint.rtopune@gmail.com या ई-मेलवर किंवा ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे. जर हे भाडं MSRTC च्या बसच्या भाडेदरापेक्षा दीड पट पेक्षा अधिक आकारल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. Pune Ambulance Rate Card: रुग्णवाहिकांचा काळाबाजार रोखण्यासाठी Pune RTO कडून दर निश्चिती .
पहा ट्वीट
#दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी बसचे भाडेदर @msrtcofficial च्या बसेसच्या भाडेदराच्या दीडपटीपेक्षा जास्त असल्यास buscomplaint.rtopune@gmail.com या ई-मेलवर किंवा ८२७५३३०१०१ या व्हॉट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी- प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे pic.twitter.com/YihLCLRvub
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) November 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2023 11:19 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

