Pune Road Rage: पिंपरी चिंचवडमध्ये ऑडी कार चालकाने दुचाकीस्वाराला बोनेट वरून नेले फरफटत; 3 जण अटकेत
पुणे पोलिसांनी कार चालकासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागामध्ये एक बाईकस्वारला ऑडी चालकाने सुमारे 2 किमी त्याच्या गाडीच्या बोनेट वरून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना 1 डिसेंबर 2024 ची आहे. या प्रकारामुळे पुन्हा पुण्यामध्ये रस्ते सुरक्षा आणि बेदरकार चालकांचा प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणामध्ये कारवाई करत तिघांना अटक केली आहे. कार चालक आणि त्याच्या दोन मित्रांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून ते मद्यधुंद होते का? याचा तपासही केला जाणार आहे.
Maharashtra | A bike rider in Pune's Pimpri Chinchwad was dragged on the bonnet of an for 2 kms after an altercation with the car driver on December 1. The car driver along with his two friends has been arrested and booked under section 103 BNS. The blood sample of the…
— ANI (@ANI) December 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 03, 2024 08:35 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

