Pune MSME Defence Expo: महाराष्ट्र 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (PIECC) येथे पहिला-वहिला मेगा एमएसएमई डिफेन्स एक्स्पो आयोजित करत आहे. या एक्स्पोचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कार्यक्रमात संरक्षण कंपन्या आणि भारतीय संरक्षण दल आणि इतर जागतिक संरक्षण उत्पादकांना त्यांची क्षमता आणि उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योगांच्या मोठ्या सहभागासह या प्रदर्शनाचे उद्दिष्ट राज्याला संरक्षण उत्पादनाचे केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे हे आहे. विविध महाराष्ट्रीय विद्यापीठे आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांतील सुमारे 10,000 विद्यार्थीही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ज्याद्वारे  विद्यार्थ्यांना संरक्षण उद्योगाशी जवळून काम करणाऱ्या व्यावसायिक तज्ञांशी नेटवर्किंग करण्याची संधी प्राप्त होईल. (हेही वाचा: Special Bus Services For Shiv Jayanti 2024: शिवभक्तांसाठी खुशखबर! शिवजयंतीनिमित्त PMPML विशेष बससेवा चालवणार; 'या' वेळेत धावणार बस)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)