Pune Mercedes Car Accident: महाराष्ट्रातील पुण्यात पुन्हा एकदा एका लक्झरी कारने चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नुकत्याच घडलेल्या पोर्शे रोड अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. आताचा हा अपघात पुण्यातील गोल्फ कोर्स परिसरात आज दुपारी घडला. या ठिकाणी एका मर्सिडीज कारने दुचाकीस्वाराला चिरडले, परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. केदार मोहन चव्हाण (41) असे मृताचे नाव आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मर्सिडीज चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याप्रकरणी येरवडा पोलीस तपास करत आहेत. या आलिशान कारच्या विंडशील्डवर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे 'लस उत्पादक, आवश्यक सेवा' स्टिकर होते, परंतु कार कोण चालवत होते हे स्पष्ट झाले नाही.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, मोटारसायकलचा तोल गमावून चव्हाण रस्त्यावर पडले आणि त्यांच्या काही लक्षात येण्यापूर्वीच मागून येणाऱ्या एका मर्सिडीजने त्यांना चिरडले. चव्हाण हे पुण्यातील पद्मावती परिसरातील रहिवासी होते. ते ईव्ही कुरिअर सर्व्हिसेसमध्ये काम करत होते आणि स्वारगेटहून पुणे विमानतळावर पॅकेट देण्यासाठी जात होते. (हेही वाचा: Dead Infant Found in Garbage: पुण्यात कचराकुंडीमध्ये आढळले प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृत अर्भक; अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)