मुंबई उच्च न्यायालयाने कामाकाझी सोल्यूशन प्रायव्हेट आणि इतरांना फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (PPL) परवाना न घेता, मुंबईतील एका हॉटेलमध्ये 2024 च्या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला 400 हून अधिक म्युझिक लेबल्स आणि 45 लाखांहून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत गाणी वाजवण्यास मनाई केली आहे. न्यायमूर्ती रियाझ छागला यांनी असे निरीक्षण नोंदवले की, जर असा अंतरिम दिलासा दिला गेला नाही तर पीपीएलचे ‘भरून न येणारे नुकसान होईल’. विविध सोशल मीडिया पोस्टद्वारे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळाल्यानंतर, पीपीएलने कामकाझी आणि इतरांविरुद्धच्या याचिका दाखल केली होती. (हेही वाचा: Maratha Candidates Under EWS Category: मराठा उमेदवरांना आता EWS प्रवर्गातून सरकारी नोकरीत नियुक्त्या देण्याचे Bombay High Court चे निर्देश)
Bombay HC Restricts Hotel From Playing Copyrighted Songs On New Year's Eve Without PPL License
By: @UrviJM https://t.co/GUkVFOuyZI
— Free Press Journal (@fpjindia) December 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)