आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखीने प्रस्थान केले आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक देहूत दाखल झाले आहेत. दोन वर्षांनंतर प्रत्यक्ष पायी वारी होणार असल्याने देहूत सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. वारी ही विठोबाच्या सन्मानार्थ महाराष्ट्रातील पंढरपूरची यात्रा आहे. या वारीत अनेक भाविक पायीच सामील होतात. ही परंपरा 700 ते 800 वर्षांहून अधिक जुनी आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)