महाराष्ट्रातील चंद्रपूर येथील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील (Ballarshah Railway Station) फूट ओव्हर ब्रिजचा काही भाग कोसळल्याने (Footover Bridge Collapse) रविवारी मोठी दुर्घटना घडली. या घटनेत सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. अपघातादरम्यान अनेक प्रवासी सुमारे 60 फूट उंचीवरून पुलावरून रुळावर पडले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)