कोरोनाचं सावट थोडं शमल्यानंतर आता अनेक दिंड्या, पालख्या पंढरपूर कडे प्रस्थान ठेवणार आहेत. यामध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या मानाच्या पालख्यांचाही समावेश आहे. काल या दोन्ही पालख्या पुणे नगरीमध्ये दाखल झाल्या होत्या यावेळी पुणेकरांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत करत दर्शन घेतले. सामान्यांसोबत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
पालखी सोहळा पुण्यनगरीत दाखल.#संततुकाराममहाराज #ज्ञानेश्वरमहाराज @PMCPune @PuneCityPolice pic.twitter.com/JUBp8KoQuT
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) June 22, 2022
मुरलीधर मोहोळ दर्शनाला
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथात माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. रथात दर्शन घेण्याची आणि माऊलींच्या पादुकांजवळ काही वेळ घालवण्याची अविस्मरणीय अनुभुती अनुभवायला मिळाली, हे माझं भाग्यच समजतो. pic.twitter.com/lXYxkcAoTn
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) June 23, 2022
माऊलीं चे पुणे नगरीत आगमन...!@Kr_Mulik @PandharpurVR pic.twitter.com/NgxfYKe6f0
— #वारी पंढरीची krushna mulik (@Kr_Mulik) June 22, 2022
वारी महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैशिष्ट आहे. शेकडो वर्षाची ही महाराष्ट्राची परंपरा अखंड पणे चालू आहे. असंख्य लोक वारीला जातात.
वारीला जाणे म्हणजे ' आनंदाचे डोही आनंद तरंग.
भक्त आणि देव यांच्या एकत्र येण्याचा हा वारीचा मार्ग म्हणजे परमेश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग. pic.twitter.com/EDtKrNX3Vx
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)