शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि आमदार यांच्यावर प्रतिक्रिया देतानी संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की शिवसेना (Shivsena) कुणी हायजॅक करु शकत नाही, आम्हाला खात्री आहे की बंडखोर आमदार मुंबईत परतले की ते पुन्हा आमच्या बाजूने परततील. मी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते यांना सल्ला देईन की त्यांनी या प्रकरणात अडकू नका आणि त्यांच्या प्रतिष्ठेसाठी जे काही शिल्लक आहे ते वाचवा. निवडणुकीत एकमेकांना बघू. महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावर या, बघू कोणाची सत्ता आहे. मी हवेत बोलत नाही. उद्धवजी जे म्हणतात ते मी म्हणतो. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. आम्ही कोणाचीही सुरक्षा हटवली नाही, लोकांमध्ये नाराजी आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की, या गोंधळातून बाहेर राहा, नाहीतर ते अडकतील.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)