राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारच्या "कथनी आणि 'करणी' यात फरक आहे. मणिपूर हिंसाचार प्रकरणात झालेल्या एफआयआरच्या संख्येनुसार अटकेची संख्या आहे का? या प्रकरणात आतापर्यंत 6000 हून अधिक एफआयआर दाखल झाल्या आहेत. पण त्यापैकी किती प्रकरणात अटक झाली? एफआयआर आणि अटक यांची जर आपण तुलना केली तर केवळ दोन, असे उत्तर मिळते. आपण हे पाहू शकतो की जशी कारवाई व्हायला हवी होती तशी झाली नाही. जोपर्यंत पंतप्रधानांच्या मनात हे (हिंसाचार) नियंत्रणात आणावे लागेल असे वाटत नाही तोवर ते सुरुच राहणार. ज्या दिवशी त्यांना हे त्यांच्या मनात येईल तेव्हाच ते कमी होईल. घटनास्थळी जा, लोकांसोबत संयुक्त बैठक घ्या. तरच आपण म्हणू शकतो की, पंतप्रधान जे बोलतात ते सत्य आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)