महाराष्ट्रामध्ये सत्तांतराच्या सुनावणीच्या अंतिम निर्णयाच्या आधी काही तास एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीची नोटीस (ED Summons) आली आहे. दरम्यान जयंत पाटील यांनी या नोटीसीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मीडीयाशी बोलताना त्यांनी नोटीशीमध्ये प्रकरणाचा उल्लेख नाही. पण फाईल क्रमांकावरून पाहता त्यांनी ही नोटीस IL&FS प्रकरणी दिली आहे. या संस्थेकडे आपण कधी गेलो नाही आणि कर्जही घेतलं नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ईडीकडे एजन्सीसमोर हजर राहण्यासाठी 10 दिवसांची मुदत मागितली.
NCP leader Jayant Patil sought 10 days time from ED to appear before the agency.
Enforcement Directorate had sent a summon to Jayant Patil and called him for questioning today, in connection with the IK&FS scam https://t.co/35JHEubWB5
— ANI (@ANI) May 12, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)