Mumbai Weather Update: मुंबईत 23 आणि 24 सप्टेंबरला सलग दोन दिवस पाऊस झाला आणि गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेला कोरडा हंगाम संपला. मुंबईत आजही मुसळधार पावसाने नागरिकांना दमट उष्णतेपासून दिलासा दिला. सकाळपासून शहरात पावसाची रिमझिम सुरु होती व संध्याकाळपासून उपनगरांसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत असल्यचे अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आले आहेत. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे शहरात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचले असून, त्यामुळे वाहनचालकांना पाण्यातूनच पायपीट करावी लागत आहे. भांडूप, मुलुंडसह घाटकोपर, कांजुरमार्ग, पवई, एलबीस रोड भागाला पावसाने झोडपून काढल्याने या ठिकाणी रस्त्यांना अगदी नदीचे स्वरूप आल्याचे दिसले.

दरम्यान, आज हवामान खात्याने मुंबईसह राज्यातील अर्धा डझन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. (हेही वाचा: Pune Weather Update: पुण्यात मुसळधार पाऊस; रस्ते जलमय, पुढील 24 तासांत वादळी वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)