Mumbai Weather Prediction, July 2: भारतीय हवामान विभागने मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईत पावसाचा जोर वाढेल असे कुलाबा वेधशाळेने सांगितले आहे. मान्सून या  वेळी मुंबईत वेळेच्या आधी दाखल झाला होता मात्र जून महिन्यात पाहिजे तेवढा पाऊस नाही पडला. पण जुलै महिन्यात पाऊस दमदार हजेरी लावेल. हवामान विभागने 1 जुलै ते 3 जुलै या दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.मुंबईत आज 1 जुलै 2024 रोजी तापमान 29.04 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 28.18 °C आणि 29.2 °C दर्शवतो. नैऋत्य मान्सून पुढे सरकल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तलावांमधील पाणीसाठा जवळपास संपुष्टात आल्याने मुंबईतील प्रत्येकजण पावसासाठी उत्सुक आहे. पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग वाढल्याने आठवडाभर मुंबईसह राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.आता मुंबईत उद्याचे हवामान कसे असेल ह्यासाठी हवामान विभागने मुंबई चा उद्याचा हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Weather Forecast For Tomorrow: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज

मुंबईत उद्याचे हवामान कसे?

हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy rain in Maharashtra) इशारा दिला आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)