Weather Forecast For Tomorrow: कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज
विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तथापी, मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो.
Weather Forecast For Tomorrow: हवामान विभागाने (IMD) येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा (Heavy rain in Maharashtra) इशारा दिला आहे. याशिवाय कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात वर्तवण्यात आली आहे. तथापी, मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो. हवामान विभाग तज्ञ के एस होसाळीकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊटंवरून उद्याचा हवामान अंदाज (Weather Forecast For Tomorrow) वर्तवला आहे. (हेही वाचा - Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!)
के एस होसाळीकर यांचे ट्विट -
30 Jun, IMD ने येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा.
📌कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 2 दिवस 🟠ऑरेंज अलर्टसह अतिवृष्टीची शक्यता. पुणे घाट परिसर कृपया पहा
विदर्भाच्या काही भागात मेघगर्जनेची⛈️ शक्यता. मराठवाड्याच्या काही भागात हलका-मध्यम पाऊस पडू शकतो pic.twitter.com/8OJgJk9oky
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 30, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 04:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

