मुंबई शहरातील हवेची पातळी अद्यापही खालावलेलीच आहे. मुंबई महापालिकेकडून वायूप्रदूषण आणि हवेची खालावलेली गुणवत्ता यातून मार्ग काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र, असे असले तरी अद्यापही या प्रयत्नांना फारसा वेग आला नाही. परिणामी हवेची गुणवत्ता घसरण्याचा प्रकार कायम आहे. आज (5 नोव्हेंबर) सकाळीही मुंबईतील सीएसटी आणि मरीन ड्राईव्ह परिसरात सकाळी 6.58 च्या सुमारास हवेमध्ये दाट धुक्याचा थर पाहायला मिळाला. आपणही याचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
#WATCH | Maharashtra: A layer of haze visible in Mumbai this morning as air quality deteriorates
(Visuals from Marine Drive & CST, shot at 6:58 am) pic.twitter.com/6Nnktfr2mV
— ANI (@ANI) November 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)