Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. कु.तटकरे म्हणाल्या की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती. आता ही नोंदणी सप्टेंबर २०२४ मध्येही सुरू राहणार आहे. तरी अधिकाधिक महिलांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. (हेही वाचा; Water Scarcity in Maharashtra: नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पापासून ते जलयुक्त शिवार योजनेपर्यंत, महाराष्ट्रातील पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी Devendra Fadnavis यांचे प्रयत्न)
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आता सप्टेंबरमध्येही नोंदणी सुरू राहणार-
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी राज्यातील पात्र महिलांना आता सप्टेंबर २०२४ मध्येही नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री @iAditiTatkare यांनी दिली.#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण#लाडकी_बहीण#MajhiLadkiBahinYojana pic.twitter.com/PRPjpVhbJa
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 2, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)