भारताला जरी 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंंत्र्य मिळालं असलं तरीही निजामांच्या तावाडीतून महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांताला सुटका मिळवण्यासाठी पुढे अजून 13 महिन्यांचा संघर्ष करावा लागला. त्यामुळे मराठवाड्यातील जनता 17 सप्टेंबर हा दिवस त्यांच्यासाठी स्वातंत्र्यदिनाइतकाच स्पेशल मानून आजच्या दिवशी सेलिब्रेशन करतात. मराठवाड्याला मुक्तता मिळावी म्हणून ज्यांनी हौताम्य स्वीकरलं त्यांना आज श्रद्धांजली अर्पण केली जाते. या निमित्त राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते यांच्यासह मान्यवरांनी सोशल मीडीयामधून मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अजित पवार
‘मराठवाडा मुक्ती संग्राम दिना’च्या शुभेच्छा! हैदराबादच्या निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त करण्यासाठी तसंच देशाच्या एकते, अखंडतेसाठी मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन लढलेल्या वीरांचे आपण सर्वजण सदैव ऋणी राहू. शहीद वीरांना भावपूर्ण आदरांजली! pic.twitter.com/P5VrYF0RDa
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 17, 2021
देवेंद्र फडणवीस
मराठवाडा मुक्ती संग्रामातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांना शत शत नमन!
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या सर्वांना शुभेच्छा!#Marathwada #मराठवाडा_मुक्तीसंग्राम_दिन pic.twitter.com/rYvHPvchVN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 17, 2021
सुभाष देसाई
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/fjyrhuZcyv
— Subhash Desai (@Subhash_Desai) September 17, 2021
चित्रा वाघ
१७ सप्टेंबर निजामशाहीच्या जुलमी जोखडातून मराठवाडा स्वतंत्र झाला होता.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे नेतृत्व आणि सरदार पटेलांची पोलीस ऍक्शन यामुळे मराठवाडा महाराष्ट्राचा एक भाग झाला.
हुतात्म्यांना सलाम. #मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🇮🇳 pic.twitter.com/C55GJXXvuy
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 17, 2021
चंंद्रकांंत खैरे
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
मुक्तीसंग्राम लढ्यातील सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन!!#Shivsena #Sambhajinagar pic.twitter.com/o7u1LW9NPK
— Chandrakant Khaire MP (@ChandrakantKMP) September 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)