Maratha Reservation Protest: मराठा आंदोलनासंदर्भातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले आहे. सरकारला अजून वेळ वाढवून दिला तर काही फरक पडत नाही असं सांगत मनोज जरांगे यांनी 2 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देत असल्याचं सांगितलं. जरांगे यांनी 9 व्या दिवशी उपोषण मागे घेतले आहे. आता दिलेला वेळ शेवटचा असल्याचं म्हणत जरांगे यांनी सरकार गंभीर इशारा दिला आहे. (हेही वाचा - Maratha Reservation Movement: मराठा आरक्षणाबाबत झालेल्या हिंसाचारामध्ये 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान; 141 गुन्हे दाखल, 168 जणांना अटक)
मनोज जरांगे-पाटील उपोषण
- सरकारला वेळ देण्यासाठी जरांगे तयार
- जरांगे २४ डिसेंबरपर्यंतचा मुदत देण्यास तयार
- सरकार २ जानेवारीपर्यंतच्या मुदतीसाठी आग्रही
- अखेर २ जानेवारीपर्यंत मुदत दिली
- ९ व्या दिवशी उपोषण मागे#ManojJarange #MarathaReservation #MarathaArakshan
— Harita | हरिता (@haritapuranik) November 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)