नुकतेच महाराष्ट्र शासनाने ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे कवी राजा नीळकंठ बढे लिखित स्फूर्तीगीत राज्याचे अधिकृत राज्यगीत (Maharashtra State Official Song) म्हणून स्वीकारले. त्यानंतर 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकृत करण्यात आले. आता हा राज्यगीताचा एक संगीत व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये महाराष्ट्रातील गड-किल्ले, समुद्र किनारे, विविध पर्यटन स्थळांचे दर्शन घडत असून, त्यासमोर अनेक कलाकार या गीताच्या शब्दांवर अभिनय करताना दिसत आहे. यामध्ये अलका कुबल, निशिगंधा वाढ, पुष्कर श्रोत्री, अभिजित खांडेकर अशा कलाकारांचा समावेश आहे.

कवीवर्य राजा बढे लिखित व शाहीर साबळे यांनी गायलेल्या गीतावर यथोचित संस्करण करून दोन चरणांसह राज्यगीत स्वीकृत करण्यात आले आहे. या गीताचा कालावधी सुमारे 1.41 मिनिटे असणार आहे. संपूर्ण गीत हे अत्यंत आशयपूर्ण, स्फूर्तीदायक आणि राज्याच्या थोर आणि शूर परंपराची गाथा सांगणारे आहे, त्यामुळे हे राज्यगीत हे विविध प्रसंगी सातत्याने सादर होणे अपेक्षित असल्याचे सरकारने म्हटले होते.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)