सध्या महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप आला आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकताच आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात उद्या विधानसभेमध्ये बहुमत चाचणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवला आहे. या पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी दोन ट्वीट केले आहेत.

पहिल्या ट्वीटमध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केले आहे. ते म्हणतात, 'न्याय देवता का सन्मान होगा! फायर टेस्ट fire test, अग्नीपरिक्षा की घडी हैं. ये दीन भी निकल जायंगे.. जय महाराष्ट्र!'

दुसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत भाष्य केले. ते म्हणतात, 'मुख्यमंत्री अत्यंत gracefully पायउतार झाले.आपण एक संवेदनशील सुसंस्कृत मुख्यंमंत्री गमावला आहे. दगाबाजीचा अंत चांगला होत नाही असे इतिहास सांगतो. ठाकरे जिंकले जनमानस देखील जिंकले. शिवसेनेच्या भव्य विजयाची ही सुरुवात आहे. लाठ्या खाऊ, तुरुंगात जाऊ, पण बाळासाहेबांची शिवसेना, धगधगत ठेऊ!'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)