Maharashtra:  नागपूर येथील प्रोमिता मुखर्जी हिने तिच्या पार्टनर सोबत गेल्याच आठवड्यात साखरपुडा केला. यामुळे सर्वांच्या भुवया मात्र उंचावल्या गेल्या. पण आम्ही हे नाते आयुष्यभरासाठी जपणार असल्याचे प्रोमिता हिने म्हटले. तसेच गोव्यात लग्नसोहळा पार पडणार असल्याची ही माहिती तिने दिली.

प्रोमिता हिने तिच्या रिलेशनशिपबद्दल वडिलांना 2013 पासूनच माहिती होते असे सांगितले. परंतु जेव्हा माझ्या आईला अलीकडेच याबद्दल सांगितले तेव्हा तिला धक्का बसला. पण नंतर तिने आमच्या रिलेशनशिपला मान्यता दिली. कारण तिला मला आनंदी पहायचे असल्याचे प्रोमिता हिने म्हटले.

Tweet:

तसेच आमच्या नात्याला माझ्या परिवाराकडून सुद्धा कधीच विरोध केला गेला नाही. माझ्या घरातील मंडळी उलट आनंदीत होती. मी एक मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि बरेच लोक माझ्याशी दुहेरी जीवन जगण्याबद्दल बोलतात कारण ते स्वत: साठी भूमिका घेऊ शकत नाहीत असे सुरभी मित्रा हिने सांगितले.

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)