राज्यविधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात विरोधक आक्रमक आहेत, याची प्रचिती अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी पाहायला मिळाली. राज्यातील विविध मुद्द्यांवरुन विरोधकांनी विधिमंडळाच्या पारयऱ्यांवर आंदोलन केले. या आंदोलनाचा व्हिडिओ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोशल मीडिया मंच एक्स (जुने ट्विटर) वर सामायिक केला आहे.

अनिल देशमुख यांनी व्हिडिओ शेअर करताना एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, ''नैसर्गिक आपत्ती आणि महायुतीच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे. असंवेदनशील महायुतीचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले.' (हेही वाचा, Maharashtra Budget 2024: अजित पवार आज सादर करणार अंतरिम बजेट; शेतकरी, महिला, तरूणांसाठी कोणत्या घोषणा होणार?)

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)