Maharashtra Legislative Council Polls: विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. यामध्ये महाविकास आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार शिवसेना नेते, आमदार ॲड. अनिल परब हे विजयी ठरले आहेत. मतमोजणीसाठी एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 64 हजार 222 मते वैध ठरली, तर 3,422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32, 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.
पहिल्या पसंतीची 44,784 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले. (हेही वाचा: Law Against Paper Leaks: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातच आणला जाणार पेपर फुटीबाबत कायदा- Devendra Fadnavis)
पहा पोस्ट-
#WATCH | Navi Mumbai | Maharashtra Legislative Council Polls: Shiv Sena (UBT) candidate Anil Parab wins Mumbai Graduate Constituency; celebrated with the party workers
(Earlier visuals) pic.twitter.com/hUFshfH6bZ
— ANI (@ANI) July 1, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)