विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक 2022 ला मंजूरी देण्यात आली आहे. या विधेयकानुसार आता राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू होणार आहे. या कायद्याच्या कक्षेत आता थेट मुख्यमंत्र्यांचाही समावेश होणार आहे. तरी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लोकायुक्त विधेयक मांडला गेला असल्याची प्रतिक्रीया सत्ताधाऱ्यांनी दिली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी दिल्लीत 2011 साली केलेल्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने देशात लोकायुक्त कायदा लागू केला. तरी आता राज्यात देखील या विधेयकाला मंजूरी मिळाली आहे.
Maharashtra Legislative Assembly passes Maharashtra Lokayukta Bill 2022 pic.twitter.com/BHwgqS4rQ0
— ANI (@ANI) December 28, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)