महाराष्ट्रात पुन्हा एकदा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.  सरकारने 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या पत्नी सुजाता सौनिक यांच्यासह भारतीय प्रशासकीय सेवेतील  20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 1987 बॅचच्या अधिकारी सुजाता सौनिक यांना गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बनवण्यात आले आहे. त्या सामान्य प्रशासन विभागात (जीएडी) एसीएस या पदावर कार्यरत होत्या. मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) चे प्रमुख एस. व्ही.आर श्रीनिवास यांना धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग लिमिटेड (BEST) चे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र हे आता सरकारी वीज कंपनी 'महाडिस्कॉम' चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असतील. बेस्टच्या नवीन सरव्यवस्थापकपदी विजय सिंघल यांची तर मराठी भाषा विभागाच्या सचिवपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (हेही वाचा: JJ Hospital तील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादांवर तोडगा काढण्यासंदर्भात अजित पवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)