महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी ट्वीट करून सांगितलं आहे. दरम्यान सौम्य लक्षणं असून प्रकृती स्थिर असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. ट्वीट मध्ये त्यांनी नागपूर, अमरावती सह अन्य दौर्यांवर त्यांच्यासोबत असलेल्यांनी त्यांची कोविड चाचणी करून घ्यावी असे देखील आवाहन केले आहे. सध्या दिलीप वळसे पाटील यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Dilip Walse Patil ट्वीट
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)