महाराष्ट्रामध्ये रविवारी 18 डिसेंबर रोजी 7,135 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. प्राथमिक अंदाजानुसार सरासरी सुमारे 74 टक्के मतदान झाले. यावेळी सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठीदेखील मतदान पार पडले.  सर्वत्र मतदान शांततेत पार पडल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले. आता आज 20 डिसेंबर 2022 रोजी सर्व ठिकाणी मतमोजणी होणार आहे. ABP Majha वर तुम्ही या निवडणूक निकालाचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. दुसरीकडे,  राज्याच्या विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपैकी अनेक ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये रायगडमधील 50, बीडमधील 34, कोल्हापूरमधील 43, सांगलीतील 28, सिंधुदुर्गमधील 44 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)