यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा दिवस 6 जून दिवशी साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्यदिव्य स्वरूपात साजरा करण्याची तयारी महाराष्ट्र सरकार कडून सुरू आहे. अशातच काल राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी British Deputy High Commissioner for Western India Alan Gemmel यांची काल भेट घेतली आहे. त्यांच्याशी भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंब तलवार आणि वाघनघं आणण्यासाठी बोलणं झालं असून दर्शनासाठी या दोन्ही गोष्टी आणण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं आणि सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढील महिन्यात त्यासाठी इंग्लंडला जाणार असल्याचंही मुनगंटीवार म्हणाले आहेत. आजच्या महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळ्यातही मुनगंटीवार यांनी त्याचा पुनरूच्चार केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)