Nashik Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक बस अपघातातील जखमींच्या भेटीला, प्रशासानास कारवाईच्या विशेष सुचना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे नाशिकात झालेल्या बस-ट्रकच्या अपघातातील जखमींची भेट घेतली आहे. या अपघातात एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली आहे.

Nashik Bus Accident: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक बस अपघातातील जखमींच्या भेटीला, प्रशासानास कारवाईच्या विशेष सुचना
Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी आज पहाटे नाशिकात (Nashik) झालेल्या बस-ट्रकच्या अपघातातील (Bus Accident) जखमींची भेट घेतली आहे. या अपघातात एकूण 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. तसेच राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये तर गंभीर जखमींना 2 लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नाशिकमधील ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात, अशा ठिकाणांची ओळख पटवून कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2022 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).