महाराष्ट्र सरकारकडून काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर आज राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यांची अर्थमंत्री म्हणून बजेट सादर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जाबाबदारी आल्याने आज विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये त्यांच्याकडून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 11 वाजता विधिमंडळाचं कामकाज सुरू झाल्यानंतर दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडला जाईल. हा अर्थसंकल्प Maharashtra Assembly Live या युट्युब चॅनलवर लाईव्ह पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)