महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पापूर्वी आज (8 मार्च) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (FM Devendra Fadnavis) यांनी राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Maharashtra Economic Survey) मांडला आहे. या अहवालात राज्याचा विकास दर 6.8% राहणार असल्याचा अंदाज नमूद करण्यात आला आहे. तर देशाचा विकासदर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तणवण्यात आला आहे. कृषी आणि कृषीविषयक क्षेत्रात 10.2 टक्के वाढ अपेक्षित आहे. तसेच उद्योग क्षेत्रात 6.1 टक्के तर सेवा क्षेत्रात 6.4 टक्के वाढ होणं अपेक्षित असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. आर्थिक सर्वेक्षण दस्तऐवजात असे दिसून आले आहे की 2021-22 (RE) मधील 362,133 कोटी रुपयांच्या तुलनेत 2022-23 (BE) साठी राज्याचा महसूल 403,427 कोटी रूपये अपेक्षित आहे.
पहा ट्वीट
Maharashtra Economic Survey for the year 2022-23 tabled in the State Assembly by State Finance Minister and Deputy CM Devendra Fadanvis.
(File photo) pic.twitter.com/M5stl0d39F
— ANI (@ANI) March 8, 2023
दरम्यान राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेमध्ये आज आर्थिक सर्वेक्षण सादर करणार केला आहे. आता उद्या ते राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. पहिल्यांदाच फडणवीस अर्थसंकल्प मांडणार आहेत. नक्की वाचा: Maharashtra Budget Session 2023: अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल (Watch Video) .
आर्थिक सर्वेक्षण मध्ये मागील वर्षाचा लेखाजोखा आणि आगामी वर्षासाठीच्या सूचना, आव्हाने आणि उपाय यांचा उल्लेख केलेला असतो. आर्थिक सर्वेक्षण अहवाल सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागारांच्या देखरेखीखाली बनवला जातो. सरकारच्या धोरणांचे आणि योजनांचे काय परिणाम झाले आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, याचीही माहिती देखील त्यामध्ये असते त्यामुळे या अहवालाला विशेष महत्त्व असते.