हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंदर फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकार कोसळल्यानंतर सत्तेत आलेल्या शिवसेना (शिंदे गट) भाजप युती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. वाढती महागाई, बेरोजगारी आणि अवकाळी पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अर्थसंकल्पात नेमक्या काय घोषणा करते याबाबत उत्सुकता होती. शेतकरी कर्जमाफीबद्दल सरकार काय भूमिका घेते याबाबतही उत्सुकता होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)