Maharashtra: मुंबईतील बोरिवली परिसरात राहणाऱ्या रेखा सोलंकी या 46 वर्षीय महिलेने आपल्या 11 वर्षीय मुलीचा गळा आवळून खून केला आणि नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत मुलीच्या वडिलांनी पोलिसांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. महिलेविरुद्ध आयपीसी कलम 302 आणि 309 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. महिलेने मुलीचा खून का केला या बद्दलची माहिती सध्या समोर आलेली नाही.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)