Maharashtra Assembly Election Results 2024: राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने सुरुवाती पासूनच मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात सध्याच्या कलानुसार महायुतीही 229 जागांवर आघाडीवर असून महाविकास आघाडी सध्या 54 जागांवर पुढे आहे. दरम्यान ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का मिळाला आहे. ठाणे शहरात संजय केळकर यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. शिवसेना उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे यांचा याठिकाणी दारुण पराभव झाला आहे. मनसेचे अविनाश जाधव या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा - Maharashtra Assembly Election Results 2024: राज्याच्या विधानसभेत 'विरोधी पक्षनेता' नसणार? महाविकास आघाडीवर नामुष्की)
पाहा पोस्ट -
हा विजय विश्वासाचा, कष्टाचा, विकासाचा, आपल्या ऐक्याचा अन् महायुतीचा आहे. ✌🏼 या विजयात अनमोल योगदान देणारे माझे ठाणेकर हितचिंतक, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व प्रमुख नेते या सर्वांचे मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो. 🙏🏼🪷🚩#sanjaykelkar4thane #ठाणेकरांचा_जनसेवक #thanemla… pic.twitter.com/Rp0hVzGP76
— Sanjay Kelkar (Modi Ka Parivar) (@SanjayKelkar_) November 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)