Lok Sabha Election 2024 Result: मुंबईमधील लोकसभेच्या 6 जागांपैकी मुंबई दक्षिण मध्य जागा ही एक प्रमुख जागा मानली जाते. या ठिकाणी अनिल देसाई हे शिवसेनेकडून (यूबीटी) निवडणूक लढवत होते, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना रिंगणात उतरवले होते. आता या जागेवरून राहुल शेवाळे यांना अनिल देसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. अनिल देसाई हे मुंबई दक्षिण मध्य जागेवरून 53,384 मतांनी विजयी झाले आहेत. दक्षिण मध्य मतदार संघातच शिवसेना भवन आहे आणि दादर परिसरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे या मतदार संघात नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष होते. आता ही जागा ठाकरे गटाकडे आली आहे.
पहा पोस्ट-
NEWS ALERT | Shiv Sena (UBT) leader Anil Desai won by 53384 votes from Mumbai South Central.#LSResultsWithPTI #LSPolls2024WithPTI #LokSabhaElections2024 pic.twitter.com/mosnIXibVo
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)