Maharashtra Weather Forecast: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका दक्षिणेकडील राज्यांना जास्त बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, मुंबई आणि ठाणेसह इतर उपनगरामध्ये 11 ते 13 डिसेंबर रोजी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने या चक्रीवादळाला मंदोस असं नाव दिलं आहे. आज हे चक्रीवादळ चेन्नईच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तामिळाडूच्या किनारपट्टीला धडकणार असल्यामुळे 13 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. (हेही वाचा -Most Polluted Winter: पुणे आणि मुंबईने अनुभवली गेल्या 4 वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रदूषित थंडी; दिल्लीची परिस्थिती सुधारली)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)