Ladki Bahin Yojana: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी पहिली पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. ते म्हणाले, 'आमच्या भूमिका बदलल्या असल्या तरी महाराष्ट्राप्रती आमची दिशा आणि बांधिलकी तीच आहे. आता हा कसोटी सामना आहे… संपूर्ण पाच वर्षे… निवडणूक जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण होतील. राज्याच्या हितासाठी सरकार पारदर्शकतेने काम करेल... विरोधकांचा त्यांच्या संख्येच्या आधारावर नव्हे, तर त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या आधारे आदर करेल.’ यावेळी फडणवीस यांनी राज्यात ‘लाडकी बहिण योजना’ सुरु राहणार असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्ही लाडकी बहिण योजना सुरू ठेवू. आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम वाढवून 2100 रुपये करू. जे पात्र आहेत त्यांना त्यांचा हक्क मिळेल. जी आश्वासने दिली ती पूर्ण करणार आहोत. निकषाबाहेरील कोणी या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल. मात्र, त्याबाबतचा निर्णय लवकर घेतला जाणार नाही. आम्ही बजेटच्या वेळी तसा विचार करु. शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस योग्यप्रकारे चॅनलाईज झाल्यानंतरच ते आपल्याला करता येते.’ (हेही वाचा: देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी)
Ladki Bahin Yojana:
CM Devendra Fadanvis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजना सुरुच राहणार! २१०० कधीपासून मिळणार?#Cm #DevendraFadnavis #Ladkibahinyojana pic.twitter.com/vYnvJvlhEQ
— ABP माझा (@abpmajhatv) December 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)