महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपली मुख्यमंत्री म्हणून पहिली स्वाक्षरी पुण्यातील रूग्णाच्या Bone Marrow Transplant Treatment साठी केली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी तून 5 लाखांची मदत करण्यात आली आहे. या रूग्णाचं नाव चंद्रकांत शंकर कुर्हाडे आहे. शपथविधीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयात पोहचले. त्यांची पहिली कॅबिनेट झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केली 5 लाखांची मदत
मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली. #पुणे येथील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारांसाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. pic.twitter.com/7A9dNePlXx
— DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE (@Info_Pune) December 5, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)