मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेतील शिंदे गटाला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेच्या बाजूने निकाल देताना मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही कालमर्यादेच्या अटी असतील. यासोबतच शिवसेनेतील उद्धव गटाने कायदा व सुव्यवस्था न बिघडण्याची जबाबदारी घ्यावी, असेही म्हटले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ही हमी दिली. रॅलीला परवानगी न देऊन बीएमसीने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावर किशोरी पेडणेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यमेव जयते असे म्हणत ट्विट केले आहे.
सत्यमेव जयते
🏹⛳⛳🏹 pic.twitter.com/oq81IkcVMP
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) September 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)