सातारा कडून मुंबई कडे येणार्या मार्गिकेवर कात्रजच्या बोगद्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. बोगद्यात एका कारने ब्रेक मारल्याने मागून येणारी चार वाहनं एकमेकांवर धडकली आहेत. यामध्ये एक महिला जबर जखमी झाली आहे. सध्या या महिलेला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहे. तर कात्रजच्या बोगद्यामध्ये वेगावर मर्यादा असूनही वाहनं ती पाळत नसल्याचं समोर आलं आहे. या अपघातामुळे वाहतूक मंदावली आहे. अपघातग्रस्त वाहनं हटवून ट्राफिक सुरळित करण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.
पहा ट्वीट
#Pune: Multiple-Car Collision Brings Chaos to Katraj Tunnel On Mumbai- Bengaluru Highway pic.twitter.com/jB0afb50nc
— Punekar News (@punekarnews) December 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)